आज्जी

Posted: नोव्हेंबर 12, 2010 in Uncategorized

आज खूप दिवसानि लिहिती आहे.. काय लिहिणार हा प्रश्न नाहीये कारण, कारण लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी खूप काही आहे माझ्या आजीबद्दल… दिवाळीचा शेवटचा दिवस, सगळेजण माझ्या घरी एकत्र जमलेले भाऊबीजेच निमित्त… मस्तपैकी हसून खेळून गप्पाटप्पा चाललेल्या.. अचानक फोन आला कि आजीला रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे… सगळेचजण निघाले वाटल रुटीन आहे उद्या जाऊन भेटूयात. तास भरातच पुन्हा फोन, सिरीयस आहे तुम्हीही “दिनानाथ”मध्ये पोहचा.. आणि अगदी १५ मिनिटातच पुन्हा माझा मोबाईल वाजला, ताईचा फोन, आजी गेली… मी वेड्यासारखी पुन्हापुन्हा काय म्हणून विचारात होते… मी फोन ठेऊन निघाले. मम्मी पापा आधीच निघाले होते ते रस्त्यात असतील म्हणून त्यांना न कळवता मी निघाले.. नेहमीचा रस्ता ही संपता संपत नव्हता, डोळ्या समोरून आज्जीचा चेहरा जाताच नव्हता. हिचा हसरा चेहरा, मधाळ बोलण सर्वांना आपलास करायचं. सगळीकडे दिवाळीचा उत्साह, खूप सारे दिवे, आकाशकंदील, प्रकाश पण आम्हासर्वां भोवती एक विचित्र अंधार दाटला होता……सगळे दीप चालू असताना आमच घरच नाही तर आयुष्य उजळवून टाकणारी आमची आजी गेली होती. आम्हाला एकट सोडून, पुन्हा कधीही न येण्यासाठी.
याचवर्षी फेब्रवारी मध्ये आजोबा गेले, तेंव्हा पासून ती खचून गेली होती. वरवर आम्हाला आधार देत होती पण मनातून ती पूर्णपणे निरिच्छ झाली होती. कशातच तीच मन लागत नव्हत. त्यातच तब्येतीनीही साथ सोडली. गेल्या पंधरादिवसपासून अन्न ही सोडलं होत..अगदी शेवटी लक्ष्मिपूजेच्या दिवशी मी भेटून आले तर म्हणाली, “परत कधी येणार? लवकर ये आणि इथेच रहा” ती जरी आईची आई असली तरी आम्हा भावंडांच्या खूप जवळ होती. आम्ही ही तिच्याशी, खरतर आजी- आजोबांशी दोघांशीही खूपच attached होतो. ते दोघे ही खूप प्रेमळ, understanding आणि modest होते. आमच्या मध्ये कधीच Generation Gap आला नाही. आजी तिच्या घरात ४ पिढ्यांबरोबर रहायची, तिचा पणतू सुद्धा तिच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचा.. शाळेतून आल्यापासून आजी आजी चालूच असायचं..
आजीचा स्वभाव ही खूप बोलका आणि समोरच्याला मदद करण्याचा होता.. घरातल्या कामवाल्या बाईलाही ती जेऊ घालायची.. व्यवस्थितपना, नीटनेटकेपणा
, चांगली स्मरणशक्ती हे गुणतर तिच्या रक्तातच होते. तिचा ऋणानुबंध असणारे बरेचजण तिच्या जाण्यानी असवस्थ झाले… समोरच्याला एका बोलण्यात आपलास करणारी आजी आता मात्र आमच्यात नाही. आमच्या आयुष्यात छोट्याछोट्या क्षणांनी दिवाळी साजरी करणारी आज्जी दिवाळीच्याच शेवटच्या दिवशी सगळ्यांना सोडून गेली..
तिच्या जाण्यानी घर रिकाम झालं, तर मन तिच्या एकेका आठवणींनी भरून गेल. येणार-जाणारा प्रत्येकजण तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची आठवण काढत होता. तिने केलेल्या संस्काराची साथ आयुष्यभर राहील, नातव-पतवंड पाहिलेली माझी आजी आजही आमच्यात असल्याचा भास होतो. तिच्या खोलीतून आता आवाज देईल असं वाटत. पण….

“आदते”

Posted: ऑक्टोबर 22, 2010 in Uncategorized

नवीनच एक गाणं ऐकल… कानाला छान वाटलं म्हणून पुन्हा एकदा ऐकून कुठल्या पिच्चरच आहे तेही शोधून काढलं… त्यानंतर काय वाटल हे तुमच्याशी शेअर कारावास वाटल म्हणून लिहायला घेतलं.. सगळ्यांना आवडेलच असं नाही पण वाटल म्हणून लिहिलं…
गाण्याच्या शेवटी एक ओळ आहे,
“मै कभी भूलुंगा ना तुझे, चाहे तू मुझको देना भुला,
आदते जैसी ही तू मेरी, आदते कैसे भूलू भला…..”
खरच किती माणस आपल्या आयुष्यात अगदी “आदत” बनून जातात… अगदी आपल्याही नकळत ते आपल्या रुटीन मध्ये येतात आणि मग आपल्याला ही त्यांची सवय होऊन जाते. अगदी घरातल्या कामवाल्या मावन्शीन्पासून ते सोसायटीच्या वॉचमनच्या चिंट्या पर्यंत… जिना उतरताना रोज भेटणाऱ्या काकू एखाद दिवस नाही भेटलेल्या तर आपल्यालाही चुकचुकल्या सारखं होत. पार्किंगमध्ये आपल्याच शेजारी लावलेल्या गाडीवरून आपण अंदाज लावतो कि शेजारचे काका आज ऑफिसला गेले कि नाही ते.. काही सवयी चांगल्या असतात पण त्यांचीही सवय झाली कि मग त्या त्रास ही देतात..
पण काही वेळेस काही न काही कारणांनी आपल्याला काही लोकां पासून वेगळ व्हावं लागत, नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहाण, आपल्या मित्रांपासून आपल्या कट्ट्यापासून दूर जण हे जरा जास्तच त्रासदायी असतं… नव्या नोकरीची सवय होते. नवीन मित्र, नवीन ग्रुप भेटतात, पुन्हा नवीन कट्टा बनतो आणि गप्पा रंगतात.. आयुष्य मस्त चाललेलं असतं. आपल्यालाही रुटीनची “आदत” होऊन जाते.. मग कधी तरी चांगली opportunity मिळाली म्हणून आहे ती नोकरी बदलावी लागते..पुन्हा attachment -ditachment ची प्रचीती येते.. आपण पुन्हा जरासे हळवे होतो, वाईट तर वाटतच असतं पण नवीन स्वप्न आणि नवीन दारही खुणावत असतात..मग पुन्हा मनाची तयारी होते सगळ्यांना सोडून नवीन मित्रानाना भेटायची…. सगळे पुन्हा भेटू, कुठे?? कुठे काय आपण रोजच भेटू ना ओनलाईन!!! gtalk आहे, fb आहे, प्रोफेशनल साईट्स ही आहेतच कि मग काय आपण रोजच एकमेकाला दिसू, बोलू, नवीन अपडेट्स पाहू.. पण पण आपण भेटणार नाही हे कुणाच्याही लक्षात कस येत नाही… ??? भेटण आणि मनोसोक्त गप्पा मारण याची चव येणार आहे का त्या ओनलाईन भेटण्याला..???? नाही ना….
कारण शेवटी आपल्याच सवयी “आदते” आपल्याला छळत असतात… एका चहाच्या कटिंग सोबत होणाऱ्या नॉन कटिंग गप्पाची मजा ओनलाईन chatting ला कशी येणार?? पायऱ्यांवर बसून रंगलेली चर्चा आणि डिस्कशनमध्ये फरक असतोच…तिथे बसून केलेले plans आणि त्यानंतर लगेच बाईकला किक मारून निघण आतापुन्हा कधी होणार???एक न एक कित्ती तरी प्रश्न पडतात. पण उत्तरही मिळतात या प्रश्नांची, भेटून पुन्हा. आधी ओनलाईन मस्तपैकी डिस्कस करू प्लान बनवू आणि मग काय गाडीला किक मारून आपल्या “कट्ट्यावर” जमूया… कारण हा कट्टा ही सुद्धा एक आदतच आहेना.. आणि आता पुन्हा म्हणायचं,”आदते जैसी ही तू मेरी, आदते कैसे भूलू भला…..”

सहजच

Posted: ऑक्टोबर 18, 2010 in Uncategorized

हम्ममम… !!! बरेच दिवस झाले काही नवीन लिहिलं नाही…. लिहायला वेळच मिळाला नाही.. was busy in travelling … आता पुन्हा लिहिणार आहे.. बराच काही आहे डोक्यात..जरा वेळ काढून मस्त लिहिते 🙂
काही नवीन आपडेट करायचे आहेत नाही तर चेन नाही ना पडत 🙂

मैत्री

Posted: ऑक्टोबर 5, 2010 in Uncategorized
टॅगस्

कालच दुपारी मी “हे भलते अवघड असते” लिहिलं आणि संध्याकाळी या सगळ्याचा पुन्हा एकदा आपल्या मित्रांपासून दूर जाण कस अवघड आहे याचा प्रत्यय आला…!!

ऑफिस मधून निघाले आणि मस्तपैकी पाऊस सुरु झाला… ५-१० मिनिट थांबून आम्ही सगळे निघालो खर पण रस्त्यात पावसान गाठलच… रपारप कोसळणारा पाऊस आणि …. आणि त्यातच माझ्या बाईकन धोका दिला..!!! बर इतक्या वर्षात पहिल्यांदाच बाईक अशी पावसात बंद पडली, आधी मला वाटल होईल सुरु पण नाही.. काही केल्या ती सुरु व्हायची काही लक्षण दिसेनात.. विचार केला पुन्हा ऑफिसवर जाव गाडी लावावी आणि सरळ रिक्षा पकडून घरी जाव… पण गाडीला असं सोडून जाणं आपल्याला काही जमत नाही. कारण आज गाडी इथे ठेवली तर उद्यासाकली परत ऑफिसला कस येणार हा प्रश्न होताच… आणि आज पर्यंत मी कधीही कुठेही माझ्या गाडीला “एकटीला” सोडून आले नव्हते, मन मानायला तयार नव्हत आणि पासून अजूनच कोसळत होता…
शेवटी बरोबर असणाऱ्या मैत्रिणीला (कलीगला) म्हणल तू जा रिक्षा पकडून पुढे मी बघते काय करायचं ते.. पुढे गेलेल्या दोघांना फोन लावला पण कोणी उचलला नाही, मग मात्र गाडी ऑफिस मधेच ठेऊन निघायचं ठरवलं.. तेवढ्यात एका मित्राचा फोन आला,”कुठे अडकलीस?” म्हणाले अजून ऑफिसच्या जवळच आहे गाडीनी धोका दिला.. “आलोच मी तिथेच थांब” तो पटकन म्हणाला. तेवढ्यात मी माझ्या बरोबर असणाऱ्या मैत्रिणीला रिक्षा मिळवून दिली आणि पुढे जायला सांगितलं… पुन्हा मित्राला फोन केला म्हणल तिथेच थांब त्याच्या बरोबर आमची अजून एक मैत्रीण होती, सांगितलं कि एकजण इथून रिक्षानी निघाली आहे ती पोहचेल तेंव्हाच तू निघ… तो सुद्धा ठीक आहे म्हणाला.. पावसाचा जोर वाढतच होता आणि गाडी काही सुरु व्हायचं नाव घेत नव्हती! घराचा फोनही लागत नव्हता त्यामुळे घरी कळवण ही शक्य होईना.! गाडीला किक मारून मारून पाय दुखायला लागला होता आता..शेवटी कशी बशी बाईक सुरु झाली आणि १५-२० फुट गेली नसेल तर बंद ही पडली. तशीच कसरत करत मी अजून थोड पुढे आले… पुन्हा मित्राचा फोन “कुठे आहेस?” “मी पेट्रोल पंपाजवळ पोहचते तू तिथेच ये” मी गाडी ढकलत ढकलत म्हणाले. तिथे गेल्यावर मेक्यानिक् दिसला आणि मला एकदम हायस वाटल. मी गाडी ठीक करून घेतली, पैसे किती झाले विचारलं आणि मग लक्षात आलं कि या सगळ्या गडबडीत माझी पर्स माझ्या मैत्रीनिकडेच राहिली होती आणि ती पुढे गेले होती. माझ्याकडे एक पैसा ही नव्हता..झालं !! मी चिंब भिजून तिथे उभी होते, खूपच उन्कॉम्फोर्ताब्ले, तेवढ्यात माझा सो कॉल्ड कलीग म्हणजे माझा मित्र तिथे पोहचला. माझ्या जीवात जीव आला. त्यानी त्या मेक्यानिक् पैसे दिले, माझी पर्स नाहीये म्हणल्यावर मला ही १०० रुपये दिले आणि मग आम्ही घरी निघालो…

घरी पोहोचताच पुन्हा कॉल करून मी कधी (आणि कशी) पोहचले त्याची चौकशीसुद्धा केली.. ज्या दोघीजणी रिक्षानी गेल्या होत्या त्यांचा पण फोन आला, माझी पर्स तिच्याकडेच होती, घाई घाईत मी विसरले होते पण ती मात्र tension मध्ये होती कारण माझे पैसे ही त्यातच होते… पण मी घरी व्यवस्थित पोहचले हेच महत्वाचं होत.. घरी गेल्यावर आई-बाबा तर रागावलेच पण या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी ही मला चांगलाच खडसावलं होत, एवढ्या पावसात गाडी ऑफिसवर ठेऊन घरी जाण्यापेक्षा मी जे कारनामे केले होते ते पुन्हा न करण्याबद्दल… या सर्वांनी जी मदद केली ती खरच खूपच महत्वाची होती.. ते नसते माझ्या बरोबर tar असे मित्र मिळाले कि वाटत कि खरच आयुष्यात अजून माणसं जोडावीत आणि असंच आपला मित्र परिवार वाढवावा.

हे भलते अवघड असते……

Posted: ऑक्टोबर 4, 2010 in Uncategorized
टॅगस्

सध्याची माझी नोकरी ही Contract Based आहे.. आहे म्हणण्यापेक्षा होती असंच म्हणाव लागेल, कारण आता हा शेवटचा आठवडा आहे इथे, पुन्हा नवी नोकरी शोधणे हे सध्याचं एकमेव काम आहे. नवीन नोकरी शोधण म्हणजे पुन्हा आपला CV/ Resume अपडेट करा, त्यातली स्किल सेट्स जरा मार्केट requirement प्रमाणे बदला, पुन्हा नवीन लोकं, नवीन जॉब आणि पुन्हा नवी सुरवात..!! नवीन सुरवात करायची, तिथल्या लोकां बरोबर अड्जेस्ट करायचं, हे तर असताच पण… पण त्यांच्या बरोबर जास्त attach व्हायचं नाही हे पुन्हा ठरवायचं!!
आधीच्या सहकार्यांशी असलेली attachment अजूनही कायम आहे आणि हे ऑफिस सोडताना वाईट पण वाटतंय, कारण या सगळ्यांशी खुप छान गट्टी जमलीये.. मस्त कट्टा ही आहे आमचा, त्यामुळे आता सोडताना वाईट तर वाटतच आहे पण त्रास ही होतो. एकदा का attached झालं कि मग सोडण जरा जडच जात… त्यामुळे नवीन ऑफिस मध्ये NO ATTACHMENT…!!
आणि ही नवीन नोकरी एवढी सहजासहजी ही मिळत नाही ना.. त्यासाठी घेतलेल्या कष्टात या सगळ्या मित्र-मैत्रिणींचा पण वाटा असतोच ना… त्याच्याकडे आलेल्या जॉब opanings च्या mail ते मला forward करतात, कुठे काही जरी माझ्या profile शी match करणार दिसलं कि मला कळवतात.. मदद करतात मला चांगला जॉब मिळावा म्हणून, पण ….. पण यांना सोडून दुसरीकडे पुन्हा नवीन सुरवात करायची आहे मला आणि त्याचाच त्रास होतोय..!
नवीन नोकरी मिळाल्याचा आनंद असतोच पण या सर्वाना सोडायचं आहे याच दुखः ही आहेच… कट्ट्यावर रंगलेल्या चर्चा, भरलेली कटिंगची बिल, ऑफिस मधलं गॉसिप, त्यांनी केलेली मदद, म्हणूनच म्हणावस वाटतय, “हे भलते अवघड असते”….

मीच का???

Posted: सप्टेंबर 28, 2010 in Uncategorized

मीच का???
प्रश्न असं साधाच आणि छोटासाच पण भयंकर डोकं खाऊ…. कारणही तसंच.. दरवेळी मी फोन करायचा त्यान तो उचलायचा हे सांगण्यासाठी कि तो BUSY आहे. प्रत्येक फोन वर वेगवेगळ उत्तर तयारच असायचं, पण त्यासाठी “त्यानं” फोन उचलला तरी पाहिजे ना… म्हणजे असं कि १० मधल्या ५ वेळा फोन उचलायचा नाही बर बाकीच्या ५ मधल्या ३ वेळा तो दुसऱ्या कोणीतरी “answer” करायचं आणि फोन म्हणाल्यावर तो एकदा तरी switched off असणारच आणि उरलेल्या एक वेळेस “तो” स्वतः फोन उचलतो, तेही अगदी २ रिंग मध्ये, आणि म्हणतो — “अग जरा बिझी आहे नंतर करतो तुला फोन आरामात” … वाह काय उत्तर आहे!! त्याचा so called ‘नंतर’ कधी येत नाही… तो येतो पण तो पर्यंत मी वाट बघून बघून पुन्हा फोन केलेला असतो, कारण मध्ये २-३ आठवडे उलटलेले असतात तो पर्यंत…. दरवेळी मीच वाट बघायची, पुन्हा मीच फोन करायचा, त्यानं नेहमीच बिझी असं आणि माझ्या बिझी किंवा schedule timing मधूनही मी वेळ काढून फोन करणं… का…?????? नेहमी मीच का?????
या प्रश्नच उत्तर माझ्या स्वतः कडे ही नव्हत कदाचित कोण कडेच नसतं… पण तरीही फोन करणं सुटत नाही आणि त्या उत्तरांची पण सवय होऊन जाते मग… मग त्याचा त्रासही होत नाही, कारण आता मलाही त्याच्या बिझी असण्याची सवय झालेली असतेना….अपेक्षा केल्या आणि पूर्ण नाही झाल्या तर वाईट तर वाटतच ना.. मग अपेक्षा करणंच सोडून दिल आणि सगळ कस सोप्प झालं… प्रश्नांनी प्रश्न वाढतच जातात आणि अजूनच नवे प्रश्न निर्माण होतात…त्यापेक्षा एकान ऐकून घ्याव मग सगळा गुंता सुटत जातो… आणि नाही जरी सुटला गुंता तरी नवीन निर्माणही होत नाही… 🙂
तसं माघार घेण एवढपण अवघड नसतं कधीच. Infact आता वाटत कि उगाचच चिडले मी तेंव्हा, असतात काम एखाद्याला मीच वेड्यासारखी माग पडले त्याच्या…कदाचित.. कदाचित त्याला मी थोडा वेळ द्यायला पाहिजे होता… पण पुन्हा हे सगळ समजून उमजून ही घ्यायचं मीच.. मला पण वाटत त्यानं कधीतरी हे सगळ समजून घेऊन मला एखादा फोन करावा. असं नाही कि त्याला काही बोलायचं नसतं, कारण ‘माझ्या’ प्रत्येक फोन कर ‘तोच’ बोलत असतो. त्याला अगदी महत्त्वाच काही तरी सांगायचं असतं किंवा मग एक गम्मत सांगतो म्हणून तास न तास बोलत बसतो…. बर आणि प्रत्येक गोष्टीच्याशेवटी “यार तू असायला पाहिजे होतीस तिथे” असं ही म्हणतो… मग पुन्हा माझ मन मला म्हणत “त्याला ही आठवण येतेच कि.. ” मी मात्र उगीचच अजूनच confuse होते… त्याच्या मनातल ओळखू नाही शकत म्हणून वाईट वाटून घेते… पण एक दिवस ठरवलं अजून नाही अडकायचं या गुंत्यात.. थोडा त्रास होत असं एकदमच सगळ सोडताना पण नाही, पुन्हा न अडकणेच बरे… आधी वाटल माझ असं वागण त्याला माणूसघानेपणा वाटेल, नाहीतर म्हणेल अशी खडूस सारखी का वागतीयेस…..पण दिवसा मागून दिवस गेले तो काहीच म्हणाला नाही आणि मग मीही माझ्या कामात बुडून गेले कामाच्या नावाखाली त्याला विसरून गेले…..

अचानक एक दिवस फोन आला —- त्याच आवाज ऐकून प्राण कानात आले… एका सेकंदात सगळा भूतकाळ डोळ्यासमोर लख्ख उभा राहिला… मध्ये कित्तीतरी दिवस उलटले होते, मी त्या दिवसांचा हिशेब लावणार इतक्यात त्यानं सांगितलं किती दिवस नाही महिने झालेत..!! आम्हा दोघांना बोलून..मी निशब्द.. फक्त ऐकत राहिले… त्याच बोलण सुरूच होत.. नुसत बोलून नाही तर आम्हाला भेटून ही महिने उलटले होते.. तो “Sorry” म्हणत होता कारण त्याला आता काळात होत कि वाट बघण काय असतं ते…..आता मला त्याला भेटायाची ओढ लागली.एखाद्याला वाट बघायला लावण किती त्रासदायक असतं हे मला चांगलाच ठाऊक होत…. तितक्यातचतो म्हणाला, मला तुला भेटायचं आहे -आजच..!! मी माझ्याही नकळत “हो” म्हणाले… भेटलो, बोललो नाही पण संवाद झाला फक्त नजरेनच… हा निःशब्द संवाद फक्त त्याच्याशीच व्हायचा… काहीतरी म्हणून दोघेही हसलो… त्यानं माझा हात हातात घेतला म्हणाला, खूप दिवसांनी हसलो तुझ्या बरोबर…आता वाटल “तू भेटलीस” …. माझ्या मीच का या प्रश्नाच उत्तर मला मिळाल….

Hello world!

Posted: सप्टेंबर 24, 2010 in Uncategorized

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!